|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बंदी आदेश मोडणाऱया 2 नौकांवर कारवाई

बंदी आदेश मोडणाऱया 2 नौकांवर कारवाई 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मासेमारी बंदीचा आदेश धुडकावणाऱया आणखी दोन मच्छिमारी नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई पेली. जयगड येथील या दोन नौकांवरील 40 हजाराची मासळी जप्त करण्यात आली असून दोन लाखांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

  मत्स्य विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. जयगड येथील शौकत अब्दुल उमर डांगे व फत्तेमहम्मद मुजावर यांच्या जयगडचा राजा अशा दोन नौकांवर कारवाई करण्यात आली. आठवडाभरातील ही सलग तिसरी कारवाई असून कारवाई केलेल्या नौकांची संख्या 12 वर पोहचली आहे. पाऊस लांबणीवर गेल्याचे पाहून मच्छिमार आपल्या नौका बंदी काळातही समुद्रात ढकलत आहेत. मात्र मस्य विभागाने अशा नौकांवर करडी नजर ठेवत नियम भंग करणाऱयांविरोधात मोहीम उघडली आहे.

  डांगे यांच्या नौकेवर 30 हजारांची मासळी आढळून आली. त्यांना दिड लाखाचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. तर फत्तेमहम्मद मुजावर यांच्या जयगडचा राजा या नौकेवरील 10 हजार रूपयांची मासळी जप्त करण्यात आली. त्यापोटी 50 हजार रु.चा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष देसाई, रश्मी आंबुलकर, पुरुषोत्तम घवाळी यांच्या पथकाने केली आहे.