|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » मान्सून केरळात दाखल

मान्सून केरळात दाखल 

 

 पुणे / प्रतिनिधी  : 

सगाळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या मान्सूनचे अखेर भारतात आगमन झाले आहे. केरळमध्ये आज मान्सून दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. केरळात मान्सून दाखल झाल्याने पुढील आठवडय़ात तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्मयता आहे. दरवषी 7 ते 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होणारा मान्सून यंदा एक आठवडाभर उशिराने दाखल होण्याची शक्मयता आहे.

 13 ते 15 जून दरम्याम मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असे हवामान विभागातील साबळे यांनी सांगितले. 10 जूननंतर कोकणात पाऊस पडेल. मात्र 20 जूनपर्यंत अंतर्भागात आणि किनारपट्टीवरही पाऊस सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्मयता आहे. 28 जूननंतर पावसाचा सर्वदूर संचार होईल, असे सध्याचे चित्र आहे. मात्र हवामान विभागाचा अंदाज ज्या मॉडेल्सवर आधारित आहे, त्या मॉडेलनूसार सर्वाधिक अचूक अंदाज दोन आठवडय़ांपर्यंत देता येतो. त्यामुळे राज्यातील पावसासंदर्भात अधिक अचूक अंदाज मिळण्यासाठी आणखी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.