|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » चंद्रकांत पाटील आज स्विकारणार पदभार

चंद्रकांत पाटील आज स्विकारणार पदभार 

 

 पुणे / प्रतिनिधी : 

खासदार गिरीश बापट यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेले पुण्याचे पालकमंत्री पद महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा निर्णय घेतला. निवडणुकीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात ते मोर्चेबांधणी करत असल्यामुळे पुण्यातील कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले. सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील पालकमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

पाटील कोल्हापूरचे असले तरी पुण्याशी त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्यापासूनचा संपर्क आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघात ते लोकसभा निवडणूक काळात ठाण मांडून बसले होते. पुण्यातील काही निवडक कार्यकर्ते त्यांनी मदतीला घेतले होते. खुद्द बापट यांनीच पाटील यांच्याकडे ही जबाबदारी द्यावी असे सांगितले असल्याचीही चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत व त्याआधीपासून पाटील बापट यांचे संबंध चांगले आहेत.

 

Related posts: