|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » मुंबई आयुक्तांच्याच अपार्टमेंटमध्ये डेंग्यूचे डास

मुंबई आयुक्तांच्याच अपार्टमेंटमध्ये डेंग्यूचे डास 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई : 

 महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे निवासस्थान असलेल्या नरिमन पॉइंट येथील सुरुची, सुनिती अपार्टमेंटमध्ये डेंग्य आणि मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. आयुक्त राहात असलेल्या इमारतीतच ही स्थिती असल्याने पालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत. मंत्रालय परिसरात महापालिका आयुक्तांव्यतिरिक्त न्यायाधीश, उच्चपदस्थ अधिकारी, सनदी अधिकारी यांची निवासस्थाने आहेत. या परिसरांत सुरू असलेल्या ‘मेट्रो-3’च्या कामासाठी खोदलेले खड्डे भुयारे आणि लोखंडी चॅनेल्समध्ये पाणी जमा होऊन त्या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले आहे.