|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

मिथुन राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. मंगळवार, बुधवारी तुमचा रागाचा पारा वाढू शकतो. डावपेच टाकतांना राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला एखादा नवा फंडा मिळेल. धंद्यात वाढ होईल. वाटाघाटीत तणाव होऊ शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेसमध्ये यश प्रयत्नाने मिळेल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. विद्यार्थ्यांनी प्रयत्न सोडू नये.


वृषभ

मिथुन राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात मोठे काम जमवून  आणता येईल. क्षुल्लक वाद करू नका. डोळय़ांची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. पदाधिकार मिळेल. गुरुवार, शुक्रवारी कायदा पाळा. नम्रपणे बोला. कला, क्रीडा, साहित्यात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. प्रगतीकडे जाता येईल. कोर्टकेस लवकर संपवा.


मिथुन

तुमच्याच राशीत सूर्यप्रवेश, मंगळ, गुरु षडाष्टक योग होत आहे. जवळचे लोक राजकारणात तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. संसारात समस्या येईल. जीवनसाथी, मुले यांच्या नाराजीची शक्मयता आहे. सामाजिक कार्यात आरोप येईल. मैत्री तुटण्याची शक्मयता निर्माण होईल. नोकरीत अरेरावी करू नका. धंद्यात चांगले काम मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात तडजोड करावी लागेल. विद्यार्थ्यांनी चांगली संगत धरावी.


कर्क

मिथुनेत सूर्य प्रवेश, मंगळ, गुरु षडाष्टक योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. धंद्यात तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. नोकरांना कमी समजू नका. कठोर बोलू नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. योजनांना गुप्तशत्रू मोडीत काढण्याची शक्मयता आहे. घरातील व्यक्तींचा आधार मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. विद्यार्थीवर्गाने प्रगतीचा मार्ग धरावा.


सिंह

मिथुनेत सूर्यप्रवेश, सूर्य, गुरु प्रतियुती होत आहे. महत्त्वाची चर्चा सफल होईल. धंदा वाढेल. जमीन, घर यासंबंधी कामे करून घ्या. नोकरी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व राहील. वाटाघाटीत फायदा होईल. संसारातील गैरसमज लवकर दूर करा. शनिवारी तणाव होईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रसिद्धी, पैसा मिळेल. कोर्टकेस यशस्वी होईल.


कन्या

मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. रविवार, सोमवार सावधपणे व्यवहार करा. संयम ठेवा. घरातील कामे होतील. धंद्यात वाढ होईल. जमीन, घर संबंधी प्रश्न सोडवा. वाटाघाटीत फायदा होईल. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. तुमची मदत घेतली जाईल. अधिकार मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. परीक्षेत मागे राहू नका.


तुळ

मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. मंगळवार, बुधवार राजकीय, सामाजिक कार्यात तणाव, गैरसमज होईल. आग लावणारे लोक कट करतील. घरात मतभेद होतील. धंद्यात जम बसवता येईल. वादाचा प्रसंग येईल.  संयम ठेवा. कला, क्रीडा साहित्यात शनिवारी शुभसमाचार मिळेल. मित्र दुरावण्याची शक्मयता आहे. पैसा उधारीवर देऊ नका. कोर्टकेसमध्ये कमीच बोला.


वृश्चिक

मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. गुरुवार, शुक्रवारी सर्वत्र सावध भूमिका घ्या. धंद्यात तणाव होईल. प्रवासात सावध रहा. वाटाघाटीत फायदा होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात जिद्दीने कामे करा. लोकप्रियता टिकवा. कला, क्रीडा, साहित्यात प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेस सावधपणे हाताळा. विद्यार्थ्यांनी विचलीत होऊ नये. अभ्यास करावा.


धनु

मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. महत्त्वाची कामे लवकर होतील, असे समजू नका. प्रयत्न ठेवा. संसारात वाद होतील. आपसात गैरसमज होईल. राजकीय, सामाजिक कार्यात निर्णय जपून घ्या. शनिवारी प्रवासात सावध रहा. धंद्यात काम मिळेल. जिद्दीने कामे करा. कोर्टकेसमध्ये अडचण येईल. परंतु पुढे संधी मिळेल. मैत्रीत वाद होईल. खाण्याची काळजी घ्या.


मकर

मिथुन राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. रविवार, सोमवारी धंद्यात समस्या येईल. रागावर ताबा ठेवा. ठरविलेले काम रहित करण्याची वेळ येऊ शकते. राजकीय, सामाजिक योजनांना मात्र थांबवू नका. दौऱयात यश मिळेल. तुमच्यामुळे इतरांचा फायदा होईल. महत्त्वाची कामे करून घ्या. नंतर अडचणी वाढू शकतात. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणा मिळेल. नवीन परिचय होईल. विवाहासमयी स्थळ मिळेल.


कुंभ

मिथुन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. अडथळे येतील. परंतु जिद्दीने धंद्यात लक्ष द्या. मंगळवार, बुधवार राजकीय, सामाजिक कार्यात मतभेद होईल. तुमच्यावर कामाची जबाबदारी वाढेल. घरगुती क्षुल्लक समस्या येतील. कामे वाढतील. शनिवारी शुभसमाचार मिळेल. कला, क्रीडा साहित्यात तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. कोर्टकेसमध्ये सावध रहा.


मीन

मिथुनेत रवि प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. प्रगतीची संधी तुमच्या क्षेत्रात मिळेल. परंतु दगदग होईल. कामाची गर्दी होईल. वादाचे प्रसंग निर्माण होतील. संयम ठेवा. वाहनापासून धोका संभवतो. धंद्यात काम मिळेल. क्षुल्लक तडजोड करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात यश मिळेल. कट करण्याचा अयशस्वी प्रयत्न होईल. कोर्टकेसमध्ये बेफिकीरीने  वागू नका. घरातील माणसे मदत करतील. स्पर्धेत जिंकाल

Related posts: