|Friday, September 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘योगदीपिका’ समृध्द जीवनाचे मार्गदर्शन

‘योगदीपिका’ समृध्द जीवनाचे मार्गदर्शन 

साहित्यिक जयवंतराव आवटे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी./ गडहिंग्लज

निरोजी जीवन जगण्यासाठी समृध्द तसेच चांगल्या मार्गदर्शनाची गरज माणसाला असते. साहित्य माणसाची गरज पुरविण्याचे कार्य करत असते. साहित्यामुळे व्यक्तीला एकत्र जोडण्याचे काम असल्याने एकत्र भावनेची गरज आहे. योगसाधनेवरील ‘योगदिपिका’ सारखी पुस्तके समृध्द जीवन जगण्यासाठी आजच्या घडली आवश्यक आहेत. योगशिक्षिक राम पाटील यांचे स्वानुभवावर आधारित पुस्तकाचे वाचकांनी लाभ घ्यावे असे आवाहन साहित्यिक जयवंतराव आवटे यांनी केले.

गडहिंग्लज येथे विवेकांनद योग व ध्यान केंद्राच्या वतीने आयोजीत ‘योगदीपिका’ पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. किसनराव कुराडे होते. सुरूवातील प्रमूख मान्यवराच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. पुस्तकाचे लेखक राम पाटील यांनी स्वागतगीत म्हटले. प्रास्ताविक सुधीर पाटील यांनी केले. प्रमूख मान्यवराचे स्वागत सुरेख कळसोंडा यांनी केले. प्रमूख पाहुण्याची ओळख प्रा. श्रीकांत नाईक यांनी करून दिली. यावेळी राम पाटील यांच्या सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगत प्रा किसनराव कुराडे यांनी केले. कार्यक्रमास दिलीप जगताप, दत्ता देशपांडे, डॉ. चंद्रशेखर पट्टणशेट्टी, अंजली हत्ती, अरूण कोटगी-बेनाडीकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. सुभाष कोरी यांनी केले तर अनिशा कोटगी यांनी आभार मानले.