|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » येत्या ऑक्टोबरमध्ये होणार गोवा प्रदेशाध्यक्षांची निवड

येत्या ऑक्टोबरमध्ये होणार गोवा प्रदेशाध्यक्षांची निवड 

ऑनलाईन टीम / पणजी :

भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरु होत आहे. ही प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण होऊन गोवा भाजपाला नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे भाजपच्या पक्ष संघटनेत विविध स्तरांवरील निवडणुका होतील. उत्तर व दक्षिण गोव्यासाठी जिल्हा अध्यक्षही निवडले जातील. भाजपाच्या विविध मोर्चाचे अध्यक्ष निवडले जातील. शेवटी प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल.

या पदासाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पार्सेकर यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

Related posts: