|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » श्रद्धा कपूर साकारणार 74 वर्षीय वृद्धेची भूमिका

श्रद्धा कपूर साकारणार 74 वर्षीय वृद्धेची भूमिका 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘मिस ग्रॅनी’ या कोरियन चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये 74 वर्षीय वृद्धेची भूमिका साकारणार आहे. तेलुगू निर्माता सुरेश बाबू या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवत आहे. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहे.

‘मिस ग्रॅनी’ हा कोरियन चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा हिंदी रिमेकनंतर तेलुगू रिमेकही बनविण्यात येणार आहे. नंदिनी रेड्डी या तेलगू रिमेक बनवणार असून, त्यांच्या सिनेमाचे नाव ‘ओह बेबी’ ठेवण्यात येणार आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. सध्या श्रद्धा अभिनेता प्रभासबरोबर ‘साहो’ आणि अभिनेता वरुण धवनबरोबर ‘स्ट्रीट डान्सर3डी’मध्ये काम करत आहे.