|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » प्रशांत किशोर ज्या शाळेचे विद्यार्थी, शाह त्या शाळेचे मुख्याध्यापक

प्रशांत किशोर ज्या शाळेचे विद्यार्थी, शाह त्या शाळेचे मुख्याध्यापक 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रशांत किशोर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापेक्षा मोठे नेते नाहीत. प्रशांत किशोर यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेचे मुख्याध्यापक अमित शाह आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना पराभवापासून कोणताही राजकीय रणनितीकार वाचवू शकत नाही, असा दावा भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँगेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत बंगालचा गड राखण्यासाठी तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यावर भाजपकडून टीकास्त्र डागण्यात येत आहे.

विजयवर्गीय म्हणाले की, अमित शाह हे प्रशांत किशोर यांच्यापेक्षा मोठे राजकीय रणनितीकार आहेत. शाह ज्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्या शाळेत प्रशांत किशोर यांनी शिक्षण घेतले. त्यामुळे ममतांना प्रशांत किशोर वाचवू शकणार नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवला. तर तृणमूल काँग्रेसने 22 जागांवर विजय मिळवला आहे.

Related posts: