|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘कोरे’ची ‘एलएचबी’ मांडवी एक्स्प्रेस आजपासून धावणार!

‘कोरे’ची ‘एलएचबी’ मांडवी एक्स्प्रेस आजपासून धावणार! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोकण रेल्वेची स्वमालकीची लाल करडय़ा रंगाची LHB COACHES ची मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस सोमवार 10 जूनपासून नियमित सेवेत रूजू होत आहे. नवीन रूपात येणाऱया या गाडीत प्रवाशांना जास्त सुविधा मिळणार आहेत. दरम्यान  कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील पहिले प्रवासी प्रा. उदय बोडस हे या उद्घाटन प्रवासात मडगाव येथे उपस्थित राहणार आहेत.

  कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार, सोमवार 10 जून रोजी सकाळी 8.30 वाजता मडगाव येथून 10104 अप मांडवी एक्सप्रेस उद्घाटनाच्या फेरीला निघेल. या उद्घाटनप्रसंगी कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील पहिले प्रवासी प्रा. उदय बोडस हे मडगाव येथे उपस्थित राहणार आहेत. 1996 पासून कोकण रेल्वेत उद्घाटनाच्या गाडीने प्रवास करण्याची त्यांची ही 21 वी वेळ आहे रविवार 9 रोजी 10103 डाऊन मांडवी एक्स्प्रेस गोव्यात गेली की, त्या गाडीचे डबे सेवेतून बाहेर काढले जातील म्हणून त्या शेवटच्या फेरीने प्रा. उदय बोडस रत्नागिरी- मडगाव प्रवास करून सोमवारी सकाळी मडगाव-रत्नागिरी मार्गावर उद्घाटनाचा प्रवास करणार आहेत. जास्त प्रवासी क्षमता आणि जास्त सुविधा यामुळे डब्यांची लांबी वाढल्याने मांडवी व कोकण कन्या एक्स्प्रेसची डब्यांची संख्या 24 वरून 22 पर्यंत कमी झाली आहे.