|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » भारताविरूद्धच्या सामन्यात ऍडम झॅम्पावर बॉल टॅम्परिंगचा संशय

भारताविरूद्धच्या सामन्यात ऍडम झॅम्पावर बॉल टॅम्परिंगचा संशय 

ऑनलाईन टीम / लंडन :

केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात झालेल्या नाचक्कीतून ऑस्ट्रेलियाच्या शिलेदारांनी धडा घेतला की नाही, यावर प्रश्न चिन्हा उभे राहत आहे. कारण आता ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर ऍडम झॅम्पा भारताविरुद्धच्या झालेल्या विश्वचषक सामन्यातल्या त्याच्या हालचालींनी संशयाच्या जाळय़ात अडकला आहे.

लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात गोलंदाजी करताना झॅम्पा खिशातून काहीतरी काढून ती गोष्ट चेंडूवर घासताना दिसत आहे. झॅम्पाची ही क्लिप आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हा बॉल टॅम्परिंगचाच प्रकार आहे का अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होताना दिसत आहे.