|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » भारताचा सिक्सर किंग युवराज सिंहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारताचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा आणि 2011 च्या क्रिकेट विश्वचषकाचा भारताचा प्रमुख शिलेदार युवराज सिंह आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेत आपली निवृत्ती जाहिर केली. युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत विचार करत असल्याचे बीसीसीआयच्या एक वरिष्ट  अधिकाऱयाने या आधीच सांगितले होते.

युवराज यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु पहिल्या दोन सामन्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही. भारतीय संघात देखील त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. तर टेस्ट क्रिकेटमध्ये तर युवराजचे 2012 नंतर टीममध्ये कमबॅकच झालेले नाही. त्यामुळे तो आपल्या भविष्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.

युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. निवृत्तीनंतर युवराज आयसीसीची मंजुरी असलेल्या स्वीकृत परदेशी टी-20 लीगमध्ये फ्रीलान्स क्रिकेटर म्हणून खेळू शकतो. बीसीसीआय अधिकाऱयाच्या माहितीनुसार, टी-20 ला आयसीसीची मंजुरी मिळाली असली तरी त्याला योग्य प्रारुप मिळालेली नाही. पण पुढे जेव्हा खेळाडूंचा संघ आकार घेईल, तेव्हा निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंबाबत विचार होऊ शकतो.