|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रंगभवन चौकातील 16 दुकाने आगीत जळून खाक

रंगभवन चौकातील 16 दुकाने आगीत जळून खाक 

सोलापूर/ प्रतिनिधी

शहरातील सात रस्ता ते रंगभवन चौकाकडे जाणाऱया रस्त्याला लागून असलेल्या दुकानांना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागून फर्निचरसह 16 दुकाने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील दोन टॉवेल कारखान्यांना आग लागून लाखेंचे साहित्य जळून खाक झाले आहे. या दोन्ही †िठकाणांच्या आगीच्या घटनांत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

रंगभवन चौकातील फर्स्ट चर्च समोरील रस्त्याला लागून फर्निचर, शोभेच्या वस्तू, गॅरेज तसेच गॅस वेल्डिंगची एकमेकांशेजारी अशी 16 दुकाने आहेत. रविवारी रात्री येथील व्यापाऱयांनी नेहमीप्रमाणे दुकाने बंद केली होती. त्यानंतर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे दुकानांना आग लागल्याचे फोन येथील व्यापाऱयांना आले. आगीची माहिती मिळताच व्यापाऱयांनी दुकानांकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे लोळ आकाशाला भिडले होते, व्यापारी डोळ्यासमोर लाखो रुपयांचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे डोळ्यांनी पाहत होते. या आगीत दुकानांच्या पाठीमागे असलेल्या रंगभवन मशिदीतील काही भागाचेही नुकसान झाले आहे.

दरम्यानच्या काळात आग वाढत असल्याचे पाहून येथील लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून अग्निशामक दलाला पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती देण्यात आली. त्यानंतर अक्कलकोट रोड एमआयडीसीतील आगीच्या ठिकाणाहून दोन गाडय़ा रंगभवनकडे पाठविण्यात आल्या. परंतु, आग मोठय़ा प्रमाणात असल्याने अग्निशामक दलाच्या इतर गाडय़ांनाही या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. या काळात आगीने पत्राशेडचे लोखंडी अँगल वाकले होते, तर पत्रे खाली गळून पडले होते. या कारणांमुळे आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागला. आग आटोक्यात आणण्यासाठी पत्रे हटवून आगीवर नियंत्रण मिळविण्याचाही प्रयत्न झाला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत पेटलेल्या दुकानांवर चारही बाजूंनी पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आली. यासाठी मात्र साधारण तीन तासांपेक्षाही जास्त वेळ लागल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी दिली.

metle keÀejKeev³eeueener Deeie

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सुत कारखान्यांना लागलेली आग  आटोक्यात आणण्यासाठी दोन तासांचा वेळ लागला. एका कारखान्याला लागलेल्या आगीच्या ज्वाळांनी शेजारील कारखान्यातील सुताने पेट घेतला असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या वतीने देण्यात आली. 

चौकट

अग्निशमन विभागात जागा रिक्त

वाढत्या लोकंसंख्येच्या मानाने अग्निशमन दलातील मनुष्यबळ अपुरे पडत आहे. सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या 10 जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. सध्या शहराच्या लोकसंख्येचा विचार करता केवळ 43 लोकांवर या विभागाचे काम चालते. अग्निशामक दलाची शहरात 7 केंद्रे आहेत. तसेच 9 गाडय़ा त्यांच्याकडे आहेत. मात्र आणखी 4 गाडय़ांची आवश्यकता आहे.

चौकट

45 बंबांनी पाण्याचा मारा

सोमवारी मध्यरात्रीनंतर अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कारखान्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी 20 तर रंगभवन चौकातील दुकानांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून साधारणा 25 बंब पाणी मारण्यात आले. दोन्हीकडील आगी आटोक्यात आणण्यासाठी एकून 45 बंब पाणी मारल्याची माहिती केदार आवटे यांनी दिली.

चौकट

रंगभवन येथे सात वर्षातील आगीची तिसरी घटना

रंगभवन चौक परिसरात असलेल्या फर्निचर तसेच इतर दुकानांना आग लागण्याची सात वर्षातील ही तिसरी घटना आहे. पूर्वी लागलेल्या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यात पुन्हा सोमवारी पहाटे आग लागल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.