|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » दिवा स्थानकजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

दिवा स्थानकजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची कल्याणहून मुंबईकडे येणारी वाहतूक 40 मिनिटे उशिराने होत आहे.

डोंबिवली स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यानंतर रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सलग दुसऱयाही दिवशीही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.