|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » नगर रस्त्यावरील भीषण अपघातात तीन ठार, एक जखमी

नगर रस्त्यावरील भीषण अपघातात तीन ठार, एक जखमी 

ऑनलाईन टीम / नगर :

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटय़ाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या स्कार्पिओच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी पहाटे हा अपघात झाला.

फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय 20) ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (30) इरफान शयशोदोहा अन्सारी (20, तिघेही रा. धुळे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अदनान निहाल अन्सारी (21, रा. धुळे) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून नगरकडे जाणाऱया रस्त्यावर जातेगाव फाटय़ाजवळ उभ्या असणाऱया ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्कार्पिओ जीपने जोरदार धडक दिली. पहाटेच्या झोपेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Related posts: