|Monday, September 23, 2019
You are here: Home » विविधा » भीक मागून 17 दिवसात जमा केले 35 लाख

भीक मागून 17 दिवसात जमा केले 35 लाख 

ऑनलाईन टीम / दुबई :

संयुक्त अरब अमिरातमध्ये एका युरोपियन महिलेने 17 दिवसात सोशल मीडियाचा वापर करुन चक्क 35 लाख रुपयांची भीक जमा केली आहे.

‘मी घटस्फोटीत आहे, माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी मला आर्थिक मदत करावी’, अशी मागणी या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करत 50 हजार डॉलर म्हणजेच 35 लाख रुपये अवघ्या 17 दिवसात जमवले आहेत. मात्र, या महिलेचे बिंग फुटून तिला फसवणुकीच्या गुह्याखाली अटक करण्यात आली आहे. या महिलेने सोशल नेटवर्किंग साइट्सवर अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवरुन तिने आपल्या मुलांचे फोटो शेअर केले. या फोटोबरोबर दिलेल्या महितीमध्ये तिने या मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत मागितली.

या प्रकरणात जेव्हा महिलेला पोलिसांनी अटक केली तेव्हा तिच्या पतीने संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे सांगितले. न्यायालयातही त्याने मुले माझ्यासोबत राहत असल्याचे पुरव्यासहीत सिद्ध केले. पतीने सादर केलेल्या पुरव्यावरुन ही महिला खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले. घरची आर्थिक परिस्थिती योग्य असतानाही नेटकऱयांना खोटी माहिती देत पैसे जमवण्यासाठी त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दुबई पोलिसांनी भीकाऱयांबद्दल सहानुभूती ठेऊ नका, असे आव्हान केले आहे.