|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट सोमवारी रात्री हॅक करण्यात आले आहे. अय्यिलिदीज तिम तुर्कीश सायबर आर्मीने हे अकाऊंट हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांच्या सायबर खात्याने हे आकाऊंट पूर्ववत केले आहे.

अकाऊंट हॅक केल्यानंतर अमिताभ यांचा फोटो काढून त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. तसेच त्यांच्या प्रोफाईलवर लव पाकिस्तान असा संदेशही लिहिण्यात आला होता. त्यानंतर अनेकांनी बच्चन यांना ट्विट करुन याबाबत विचारणा केली. त्यानंतर हे अकाऊंट हॅक झाल्याचे समजले.