|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘नुबिया रेड मॅजिक 3’ चे लवकरच भारतात लाँचिंग

‘नुबिया रेड मॅजिक 3’ चे लवकरच भारतात लाँचिंग 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘नुबिया रेड मॅजिक 3’ हा गेमिंग स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. लाँचिंगनंतर येत्या 17 जूनपर्यंत फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी असणार आहे. चीनमध्ये या फोनची विक्री सुरु झाली आहे.

‘नुबिया रेड मॅजिक 3’ हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज या तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत जवळपास 36 हजार 200 रुपये आहे. 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरिएंट मोबाइलची किंमत 44 हजार 500 रुपये असणार आहे.

स्मार्टफोनला 6.65 इंचाचा अल्ट्रा ब्राइट फुल एचडी अमोल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा रिअर आणि 16 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा आहे. रेड मॅजिक गेमिंग स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रगन 855 प्रोसेसर आहे. 12 जीबी रॅम आणि एक 4 डी वायब्रेशन मोटर आहे. या फोनमध्ये हायब्रिड कूलिंग फॅन असणार आहे. ज्याच्यामुळे फोनचे तापमान नियंत्रित होईल आणि फोन ओव्हरहिट होणार नाही. फोनची बॅटरी क्षमता 5000 एमएएच आहे. काळा, लाल, कॅमोफ्लॉज, ब्लू-रेड ग्रेडिएंट रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.