|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

फांद्या डहाळय़ा तेडून वटपौर्णिमेचे पूजन करू नका

बुध. दि.12 ते 18 जून 2019

 भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस, नक्षत्र व योग तसेच महिन्याला काही ना काही धार्मिक महत्त्व आहे. नवविवाहीत, गृहीणी आपल्या पतीचे आरोग्य चांगले रहावे, त्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वट पौर्णिमेचे व्रत करतात. सत्यवान सावित्री व्रत तरी प्रसिद्धीचे आहे. पण वटसावित्री व्रताचे खरे महत्त्व काय आहे? याकडे कुणीच लक्ष देत नाहीत. वटवृक्ष हा शितल छाया व प्रचंड प्रमाणात प्राणवायू सोडणारा वृक्ष आहे. याचे संवर्धन करणे, त्याची जोपासना करणे व त्यायोगे वायुप्रदूषण नष्ट करणे हा त्यामागील हेतू आहे. पण लोक वटवृक्षाला दोरे गुंडाळतात अशाने काहीही साध्य होणार नाही. एक दिवस वटवृक्षाला दोरे गुंडाळून पूजा केली, म्हणजे पतीचे आयुष्य वाढते हे सुशिक्षित मनाला पटत नाही. वास्तविक पती-पत्नीने परस्परातील मतभेद विसरून कायम प्रेमाने रहावे व दोघांनीही वटवृक्षासारखे विशाल मन ठेवून आनंदाने संसार करावा. व्यसन व काही मतभेद असतील तर ते सामंजस्याने मिटवावे. संपदेचे रक्षण करावे, हा या व्रतामागील खरा हेतू आहे. फक्त स्त्रियांनीच हे व्रत का करावे? वास्तविक पुरुषांनीदेखील आपल्या पत्नींचे आयुष्य वाढावे, ती सुखी रहावी, यासाठी हे व्रत केले पाहिजे. पण सहसा असे होत नाही. वास्तविक वडाचे महत्त्व त्याचे औषधी उपयोग, त्याची दैवी शक्ती तसेच त्याच्या पूजनाने कोणत्या शक्ती प्राप्त होतात, या वृक्षाचे संवर्धन केल्याने प्रदूषण कसे नष्ट होते? याबाबत पुरोहित वर्गाने जागृती करण्याची गरज आहे. कारण वटवृक्षाशी अधिकाधिक संबंध ब्रह्मवृंदांचाच येतो. वटवृक्षाच्या समिधा होमात वापरल्याने काय फळ मिळते. कोणत्या देवाशी संबंधित कार्य होते, याची कल्पनाही देणे आवश्यक आहे. पण सहसा तसे घडत नाही. पौराणिक कथेलाच हे लोक कवटाळून बसलेले आढळतात. जी जी धार्मिक व्रते सांगितलेली आहेत, त्या प्रत्येकामागे काहीना काही सामाजिक कारणे आहेत. लोकांना त्याचे ज्ञान झाले, तर लोक डोळसबुद्धीने व्रते करू लागतील व कोठेही अंधश्रद्धेला वाव राहणार नाही. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी ज्यावेळी मोठमोठी संकटे येतात, त्यावेळी नास्तिक क्यक्तीसुद्धा देवाधर्माच्या मागे लागते. डॉक्टर  कितीही तज्ञ असले तरी पेशंटची हमी देत नाहीत. देवावर भरोसा ठेवा असेच सांगतात. हल्ली जग सुशिक्षित होत आहे. पूर्वीच्या काही परंपरा व रुढी आता कालमानानुसार बदलण्याची गरज आहे. वटवृक्षाखाली बसून जर सर्वांनी महामृत्युंजयाचा जप केला तर खऱया अर्थाने यमाला माघारी पाठविल्याचा हेतू साध्य होईल. कारण मृत्युंजय मंत्र हा एकच मंत्र असा आहे की ज्याला यमराज घाबरतात. यासाठीच कोणतीही व्रतवैकल्ये करताना त्यामागील शास्त्रीय व सामाजिक कारणांचा अभ्यास करून डोळसबुद्धीने ही व्रते करावीत. सौभाग्यवती स्त्रियांनी वटवृक्षाचे पूजन करावे पण त्यांच्या फांद्या व डहाळय़ा तोडून त्याची पूजा केल्यास संसार कधीही सुखाचा होणार नाही. उलट नको त्या संकटाना आमंत्रण दिल्यासारखे होते हे लक्षात ठेवावे.

मेष

शुक्राच्या प्रभावामुळे पैसा बऱयापैकी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक. काळजी घ्यावी. जुन्या वस्तुच्या खरेदी-विक्रीत लाभ. घरादारासंदर्भातील कामे होऊ लागतील. न्नोकरी, व्यवसायाच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना. चतुग्रह युती, तृतीयात आहे. शेजारी व नातेवाईकाशी जेवढय़ास तेवढेच संबंध ठेवा. प्रवासात नको ते धाडस करू नका. दुर्घटना, आजार, अपघात, वाढते खर्च या दृष्टीने जपावे लागेल.


वृषभ

सप्तमात होणारी वटपौर्णिमा वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण निर्माण करील. आर्थिक बाबतीत अतिशय चांगले योग. जे काम कराल त्यात धनलाभाची शक्मयता. शनि, केतू, प्लूटो अष्टमात असल्याने काही विचित्र व त्रासदायक अनुभव येऊ शकतील. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल शक्मय. काही महत्त्वाच्या घटना घडतील. प्रवास व जत्रा वगैरे ठिकाणी त्रास होण्याची शक्मयता.


मिथुन

वटपौर्णिमा नवनवे खर्च घेऊन आलेली आहे. मनावर नियंत्रण ठेवूनच वर्तन करा. सर्व दृष्टीने जपावे लागेल. अडकलेले पैसे अचानक वसुल होतील. महत्त्वाच्या व्यवहाराची पूर्तता होईल. समस्या वाढतील नोकरी व्यवसायात मनात नसतानाही वरि÷ांना खूष ठेवावे लागेल. त्यामुळे मनस्वास्थ्य ठीक राहणार नाही. आरोग्याची काळजी घ्या.


कर्क

लाभात शुक्र असल्याने अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता. जो व्यवसाय कराल त्यात यश मिळवाल. रवि, मंगळ, राहू, गुरु शापीत योगात. त्यामुळे सर्व दृष्टीने जपावे लागेल. शत्रुच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. वैवाहिक जीवनात निर्णायक प्रसंग. पण त्यातून चांगले घडेल. वैरत्व मतभेद टाळावेत. कुणाच्याही सांगण्यावरून गैरसमज करून घेऊ नका.


सिंह

आर्थिक बाबतीत मतभेद झाल्याने नोकरीत ताणतणावाचे वातावरण राहील. मालक व कर्मचारी यांच्यात गैरसमज निर्माण करणारे ग्रहमान. केलेल्या कामाचे श्रेय मिळेलच असे नाही चांगुलपणाचा अतिरेक होऊ देऊ नका. नोकरी अथवा व्यवसाय बदलू नका. पण त्यात नवीन काहीतरी करता येईल का ते पहा. कारण नसताना दुरुस्तीची कामे काढू नका. विचारांची दिशा चंगली ठेवा. निश्चितच चांगले बदल घडतील.


कन्या

शुक्राचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे अतिउत्साहाला अवर घालावा  लागेल. काही जणांकडून काही कारणाने खुसपट काढण्याची शक्मयता. त्यामुळे तेढ निर्माण होईल. प्रवासात अडचणी व वस्तुंची अदलाबदल होण्याची शक्मयता. त्यासाठी काळजी घ्यावी. ड्रायव्हिंगची आवड निर्माण करणारे ग्रहमान आहे. नवीन वाहन शिकण्यास चांगला काळ.


तुळ

जर आर्थिक अडचणी असतील तर लक्ष्मीचे कोणतेही स्तोत्र या वटपौर्णिमेला वाचा. त्याचा चांगला अनुभव येईल. व्यवहार सरळ असतील तर कागदोपत्री चांगले यश मिळेल. कामात यश, किमती वस्तुंची खरेदी विक्री होईल. काही जुनी प्रकरणे निकालात निघतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.


वृश्चिक

वटपौर्णिमा तुमच्या राशीत होत आहे. वैवाहिक जीवनात काही मतभेद अथवा धेका असेल आरोग्याच्या तक्रारी असतील तर ते मिटविण्याचा प्रयत्न करा. स्थावर, इस्टेट, वाहन, व्यवहार, धनलाभ, प्रवास, थोरामोठय़ांच्या ओळखी या सर्व बाबतीत चांगले योग. कायदेशीर बाबतीत योग्य न्याय मिळेल.


धनु

सरकारी कामकाजात अपेक्षित यश, नोकरी व्यवसायाच्या प्रयत्नात असाल तर निश्चित यश मिळेल. योग्य प्रयत्न व कष्टाची तयारी असेल तर फार मोठे यश मिळवाल. अध्यात्मिक यश चांगले. ध्यानधारणा, मंत्रपठण वगैरेत चांगली प्रगती होईल. काही ग्रहयोग सर्व बाबतीत अनुकूल असून राजयोगासारखे फळ देतील. आर्थिक बाबतीत चांगले योग आहे.


मकर

सुप्त कलागुणांना योग्य स्थान मिळेल. नवीन आर्थिक व्यवहारात जपून वागावे. कुणालाही शब्द आश्वासन अथवा उधार उसनवार देताना खोलवर विचार करावा लागेल. खरेदी विक्री, परदेश प्रवास, राजकारण, वास्तुचे व्यवहार यात चांगले यश, आर्थिक बाबतीत लाभदायक योग, पण खर्चावर नियंत्रण राहणार नाही.


कुंभ

हाती सर्व काही आहे पण त्याचा लाभ मात्र घेता येईलच असे नाही. दूरवरचे प्रवास घडतील. अचानक उद्भवलेला खर्च, मनस्ताप निर्माण करील. सर्व बाबतीत सांभाळावे. विवाहाची बोलणी, वाटाघाटी करताना सावध रहावे लागेल. कथा कुणाची व्यथा कुणाला या म्हणीचा अनुभव येईल. पण न होणारे काम होऊन जाईल.


मीन

अचानक महत्त्वाच्या प्रसंगी नको असलेले पाहुणे येणे, त्यामुळे कामाचा खोळंबा असे प्रकार घडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार व लिखणात सावधगिरी बाळगावी. आर्थिक स्थिती चांगली राहील. बुधाचे भ्रमण आर्थिक व्यवहारात बऱयाच महत्त्वाच्या लाभदायक घडामोडी घडवील पण मानसिक गोंधळ होऊ देऊ नका. नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन जबाबदारी यशस्वी करू दाखवाल.