|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोकण रेल्वेत उपम्यात आढळले झुरळ

कोकण रेल्वेत उपम्यात आढळले झुरळ 

‘एलएचबी’ कोकणकन्या एक्प्रेसच्या शुभारंभावेळचा प्रकार

कणकवली:

कोकण रेल्वेच्या स्वमालकीच्या एलएचबी कोकणकन्या एक्प्रेसच्या शुभारंभ दिनीच कोकण रेल्वेच्या पँट्रीमधून दिले गेलेल्या शिरा उपमात मेलेले झुरळ आढळण्याचा गंभीर प्रकार मंगळवारी उघडकीस आला.

कोकण रेल्वेच्या स्वमालकीच्या लाल करडय़ा रंगाची एलएचबी कोचेसची मांडवी आणि कोकणकन्या एक्प्रेस गाडय़ा 10 जूनपासून कोरे मार्गावर रुजू झाल्या. जास्त प्रवासीक्षमता व जास्त सुविधा असलेल्या या गाडय़ा खरं तर कौतुकाचा विषय आहे. या रेल्वेडब्याच्या खिडक्या तसेच स्वच्छतागृहाचे डिझाईन अतिशय सुबक झालेले आहेत. या डब्यातला एकूणच प्रवास सुखदायक वाटतो. या एलएचबी कोचेस गाडय़ांचा पहिल्याच दिवशी आजच्या कोकणकन्या एक्प्रेसमध्ये ‘कोरे’च्या पेंट्रीतून देण्यात आलेल्या शिरा – उपम्याच्या पॅकिंग बॉक्समध्ये प्रवाशाला मेलेले झुरळ आढळल्याने ‘कोरे’चा कारभार बाह्यरुप तेवढे बदलले, आतले रुप तेच आहे, असाच आहे काय, असा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

मंगळवारी 10111 या कोकणकन्या एक्प्रेसमधील एस-7 या डब्यात कोकणकन्या एक्प्रेस मडगांवच्या दिशेने जात असताना राजापूर रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. सकाळच्या कोरेच्या पेंट्रीतून दिले गेलेल्या शिरा – उपम्याच्या बॉक्समध्ये मेलेले झुरळ आढळताच त्या प्रवाशाने इतरांना सतर्क केले. लागलीच प्रवाशांनी तो बॉक्स विक्रीस आणलेल्या सर्व्हीसमनला घेरले आणि त्या पेंट्री खानसामा विभागाच्या प्रमुखास तेथे येण्यास भाग पाडले. खानसामाने चूक मान्य करीत गयावया करण्यास सुरूवात केली. पण प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अनेकांनी या घटनेचे मोबाईल चित्रीकरण करून ते व्हायरल केले. अखेरीस संतप्त प्रवाशांनी कोरेच्या तक्रार पुस्तिकेत याची नेंद केली.

या प्रकाराबद्दल कणकवलीचे जयेश सापळे, विजय डेगवेकर, कल्याण पारकर यांनी तीव्र भावना व्यक्त करीत संबंधित खानसामा विभागावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.