|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » विदेशी गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी

विदेशी गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी 

नवी दिल्ली

 विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या आठवडय़ात भारतातील विविध बाजारात 7,095 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. गेल्या चार महिन्यांपासून हे गुंतवणूकदार भारतात विक्रीपेक्षा खरेदी जास्त करीत आहेत. मे महिन्यात या गुंतवणूकदारांनी 9,031 कोटी रुपयाची, एप्रिल महिन्यात 16,093 कोटी रुपयांची तर मार्च महिन्यात 45,981 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. फेब्रुवारी महिन्यात या गुंतवणूकदारांनी 11,182 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 3 ते 7 जून या काळात या गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात 1,915 कोटी रुपयांची तर रोखे बाजारात 5,180 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या आठवडय़ात गुंतवणूकदारांनी प्रत्येक दिवशी विक्रीपेक्षा खरेदी जास्त केल्याचे दिसून आले आहे. नवे स्थिर केंद्र सरकार चांगला अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता असल्यामुळे हे गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेबाबत आशावादी असल्याचे दिसून आले आहे.