|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » भारतात ‘ऑनर’चे नवे स्मार्टफोन सादर

भारतात ‘ऑनर’चे नवे स्मार्टफोन सादर 

नवी दिल्लीतील कार्यक्रमात सादरीकरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनची स्मार्टफोन कंपनी ऑनरकडून भारतात ‘ऑनर 20 प्रो’, ‘ऑनर 20’ आणि ‘ऑनर 20 आय’ हे तीन स्मार्टफोन सादर केले आहे. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात हे फोन सादर करण्यात आले आहे. ऑनरच्या 20 सीरीजमधील मोबाइलच्या सादरीकरणाकडे सगळय़ांचे लक्ष लागले होते. ऑनर 20 आणि ऑनर 20 या दोन्हीमध्ये प्रो ग्रेड फीचरसह चार कॅमेरे उपलब्ध आहेत.

‘ऑनर 20 प्रो’मध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असून 16 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेन्स आहे. त्याशिवाय 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असून 3 डी पोटेट लाइटनिंग फीचर आहे. फोनची बॅटरी क्षमता 4000 एमएएच इतकी आहे. फोनमध्ये सुपर चार्ज सपोर्ट असून 30 मिनिटात फोन 50 टक्के चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे.

‘ऑनर 20’ मोबाइलचा डिस्प्ले 6.26 इंचाचा असून एचडी पंच-होल आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे. त्याशिवाय 16 मेगापिक्सलचा सेंकडरी सेंसर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनची बॅटरी क्षमता 3750 एमएएच इतकी आहे.

‘ऑनर 20 आय’मध्ये 6.21 इंचाचा फुलएचडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. यात ऑक्टा कोर किरीन 710 एफ एसओसी प्रोसेसर आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात 24 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असून 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनची बॅटरी क्षमता 3400 एमएएच इतकी आहे. या फोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचर नाही.