|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » पीएनबीमध्ये महाराष्ट्र बँकेसह इलाहाबाद बँक होणार विलीन

पीएनबीमध्ये महाराष्ट्र बँकेसह इलाहाबाद बँक होणार विलीन 

वृत्तसंस्था/ मुंबई

मोदी सरकार आपल्या दुसऱया कार्यकाळात बँकांचं विलीनीकरण करण्यासाठी पाऊले उचलत आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) बँक ऑफ महाराष्ट्र आणि इलाहाबाद बँक यांचे विलिनीकरण होण्याची शक्यता आहे. याबद्दल मंत्रिमंडळाकडून लवकरच प्रस्ताव येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ओबीसी, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया यांचे विलीनीकरण करण्यासाठीही चर्चा सुरू आहे. याअगोदर बँक ऑफ बरोडामध्ये विजया आणि देना बँकेचे विलीनीकरण करण्यात आले आहे.

बँक विलिनीकरणामुळे ग्राहकांना चेकबुक आणि पासबुक या दोन्ही गोष्टी नव्याने घ्याव्या लागतात. त्याचबरोबर पुन्हा बँक एटीएम कार्डही बदलावे लागते. जेव्हा एका बँकेचे दुसऱया बँकेत विलिनीकरण होते तेव्हा कर्जाचे पैसे दुसऱया बँकेत स्तलांतरीत केले जातात. पंजाब नॅशनल बँकेत बँक ऑफ महाराष्ट्र आणि इलाहाबाद बँक यांचे विलीनीकरण झाले तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि इलाहाबाद बँक यांच्या ग्राहकांना नवं चेकबुक आणि पासबुक द्यावे लागणार आहे.

बँकांना संजीवनी देण्यासाठी प्रयत्न

सरकार एनपीएच्या ओझ्याखाली सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना संजीवनी देण्याच्या प्रयत्नात आहे. अशा प्रकारे छोटय़ा आणि कमकुवत बँकांचे एकमेकांत विलीनीकरण करून त्यांना मजबूत बनवले जाते.