|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » स्पेन, पोलंड विजयी, स्वीडन पराभूत

स्पेन, पोलंड विजयी, स्वीडन पराभूत 

वृत्तसंस्था/ माद्रीद

युरो चषक 2020 च्या पात्रता फुटबॉल स्पर्धेत सोमवारी येथे फ गटातील झालेल्या सामन्यात स्पेनने स्वीडनचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला तर ग गटातील झालेल्या सामन्यात पोलंडने इस्त्रायलचा 4-0 असा फडशा पाडला. ऑस्ट्रेलियाने नॉर्थ मॅसेडोनियावर 4-1 अशी मात केली.

फ गटातील स्पेन आणि स्वीडन यांच्यातील सामन्यात एकतर्फी झाला. स्पेनचा कर्णधार सर्जिओ रॅमोसने 64 व्या मिनिटाला आपल्या संघाचे खाते पेनल्टीवर उघडले. 85 व्या मिनिटाला मोराटाने स्पेनचा दुसरा गोल केला. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू ओरेझाबेलने स्पेनचा तिसऱया आणि शेवटचा गोल नोंदवून स्वीडनचे आव्हान संपुष्टात आणले. या विजयामुळे स्पेनने फ गटात आपले चारही सामने जिंकून 12 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. या गटात स्वीडन 7 गुणांसह दुसऱया स्थानावर तर रूमानिया तिसऱया स्थानावर आहेत. रूमानियाने माल्टाचा 4-0 असा पराभव केला. या गटात नॉर्वे संघ पाच गुणांसह चौथ्या स्थानावर असून त्यांनी फेरोई आयलंडस्चा 2-0 असा पराभव केला.

ग गटातील सोमवारी झालेल्या सामन्यात पोलंडने इस्त्रायलवर 4-0 असा एकतर्फी विजय मिळविला. या गटातील पोलंडचा हा सलग चौथ्या विजय आहे. गेल्या चार सामन्यात पोलंडने आपल्यावर एकही गोल चढवून घेतलेला नाही. सोमवारच्या सामन्यात 35 व्या मिनिटाला पिटेकने पोलंडचे खाते उघडले.

मध्यंतरानंतर पोलंडने 3 गोल नोंदविले. 56 व्या मिनिटाला रॉबर्ट लिवेनडोस्कीने पेनल्टीवर पोलंडचा दुसरा गोल केला. 58 व्या मिनिटाला ग्रोसेकीने पेलंडचा तिसरा गोल नोंदविला. 84 व्या मिनिटाला केडझीओरने चौथा गोल नोंदवून इस्त्रायलचे आव्हान संपुष्टात आणले. या गटात पोलंड 12 गुणांसह पहिल्या, इस्त्रायल 7 गुणांसह दुसऱया तर ऑस्ट्रीया 6 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. अन्य एका सामन्यात ऑस्ट्रीयाने नॉर्थ मॅसेडोनियाचा 4-1 असा पराभव केला.

स्लोव्हेनियाने लॅटव्हियाचा 5-0 असा पराभव केला.