|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पालकमंत्र्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

पालकमंत्र्यांवर शुभेच्छांचा वर्षाव 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महसूलमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून त्यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी झुंबड उडाली होती. खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री पाटील यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी अभिनव पद्धतीने साजरा केला जाते. औचित्यसाधून समाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. शेतकऱयांन मोफत खत वाटप, शहारत महिलांसाठी स्वच्छतागृह, जैविक खत निर्मितीसाठी विविध संस्थांना मदत असे अनेक उपक्रम यापूर्वी राबविले आहेत. यंदाच्या वाढदिवसाला हार बुके न आणता दुष्काळी परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर त्या भागातील मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला जिल्हय़ातील भाजपा कार्यकर्ते, सामाजिक संघटनांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मदतीचे धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करीत शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा देणाऱयांमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, हिंदुराव शेळके, जिल्हा विशेष लेखा परिक्षक धनंजय पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपा गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, सदस्य प्रसाद खोबरे, राजवर्धन नाईक निंबाळकर, गोकुळचे अध्यक्ष रविंद्र आपटे, पुरोगामी शिक्षण संघटनेचे प्रसाद पाटील, गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे, उद्योगपती चंद्रकांत जाधव, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे, भाजपा महापालिका गटनेता विजय सूर्यवंशी, कुलगुरु देवानंद शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे, भाजपाचे संघटक बाबा देसाई यांच्यासह जिल्हय़ातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, दुरध्वनीवरुन अभिष्टचिंतन केले.