|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महामार्गावरील स्काय वॉकला पडला जाहिरातींचा विळखा

महामार्गावरील स्काय वॉकला पडला जाहिरातींचा विळखा 

वार्ताहर/ आनेवाडी

आशियाई महामार्गाच्या काम पूर्णत्वच्या मार्गावर असताना असंख्य त्रुटी बांधकामा मध्ये राहिल्याने सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय विद्यार्त्यांसाठी सुरु करण्यात आलेला स्काय वॉक सुरु होण्याआधीच जाहिरातीच्या फ्लेक्सनी त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे

  गौरीशंकर कॉलेजमधील असंख्य विद्यार्थांना महामार्ग ओलंडताना निर्माण होणाऱया  अडचणींवर उपाय म्हणून सुरु करण्यात आलेल्या स्काय वॉक सुरु होण्याआधीच राजकीय पुढाऱयांच्या जाहिरात बाजीने झळाळू लागला आहे. स्काय वॉकच्या दोन्ही बाजूला दस्तूरखुद राज्याच्या मंत्रीमंडळातील नंबर एकचे मंत्री ज्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा देखील कार्यभार आहे. त्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स दोन्ही बाजूला लावून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्याचे काम केले आहे. पण महामार्गाच्या राहिलेल्या त्रुटी मात्र त्यांना कधी दिसल्या नाहीत, तसेच कधी त्यासाठी याच मंत्र्याकडे मागण्या केल्याचे दिसले नाही. मात्र सदरचा फ्लेक्स लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी घेतली का? असा सवाल आता जनता विचारु लागली आहे. 

   महामार्गाच्या कामात ज्या स्थानिक लोकांच्या जमीनी गेल्या त्यांनी याच महामार्गाच्या लगत छोटे मोठे हॉटेल व्यवसाय, रसवंती गृह, पेट्रोल पंप, टायर्सचे दुकाने तसेच या सारखे व्यवसाय सुरु केले आहेत. त्यासाठी जाहिरात करताना सेवा रस्ता व महामार्गाच्या मध्यभागी असणाऱया दुभाजकांच्यामध्येच जाहिरातीचे बोर्ड लावले होते. त्यावर मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस प्रशासनाने त्या व्यवसायिकांना नोटिस देत बोर्ड जप्ती करण्यापर्यंत कार्यवाई केली होती, मात्र तशीच कारवाई महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या स्काय वॉकवरील फ्लेक्सवर होणार का? असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारु लागले आहेत.

   रविवारी झालेल्या पावसाने स्काय वॉकच्या एका बाजू कडील फ्लेक्स वाऱयांने फाटला मात्र लोखंडी प्रेम मात्र अजून तशीच आहे. वादळी पावसात लोखंडी प्रेम तुटून महामार्गावरुन प्रवास करणाऱया प्रवाशाला लागल्यास होणाऱया नुकसानीस कोणाला जबाबदार धरायचे ? असा सवाल नागरिक विचारु लागले आहेत.