|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » 57 व्या अंकुर साहित्यसंमेलनात प्रकाश तळावडेकर यांना पुरस्कार

57 व्या अंकुर साहित्यसंमेलनात प्रकाश तळावडेकर यांना पुरस्कार 

मुक्ताईनगर। प्रतिनिधी

येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे आयोजित 57 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जळगाव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ किसन पाटील होते. या संमेलनात प्रकाश तळावडेकर यांच्यासह गोव्यातील चार कविंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

  प्रकाश तळावडेकर यांच्या प्रकाशवाट या काव्यसंग्रहाला पुरस्कार प्राप्त झाला. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. किसन पाटील यांच्या हस्ते त्यांनी तो स्वीकारला. रमेश वंसकर यांच्या झोपाळा या बालकविता संग्रहाला प्राप्त झालेला पुरस्कार त्यांच्यावतीने साहित्यिक तथा दै. तरुण भारतचे पत्रकार राजू भिकारो नाईक यांनी स्वीकारला. कालिका बापट यांच्या मनमोही या काव्यसंग्रहाला प्राप्त झालेला पुरस्कारही त्यांच्यावतीने नाईक यांनी स्वीकारला. प्रकाश क्षिरसागर यांच्या ‘जमाना बदलल्याचं चिन्ह, दुसरं काय’ या काव्यसंग्रहाला प्राप्त झालेला पुरस्कार त्यांच्यावतीने अशोक काणकोणकर यांनी स्वीकारला.

 पुरस्कार वितरण सोहळय़ाच्या व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक सुप्रसिद्ध लेखक विचारवंत आयएस बी जी वाघ, स्वागताध्यक्ष ज्ये÷ शिक्षणमहषी तथा माजी प्राचार्य  एस ए  भोईर, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ नजमा ताई इरफान तडवी, मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापती सौ शुभांगी ताई भुलाणे, केंद्रीय मानव अधिकार संघटनेचे नवी दिल्ली येथील संस्थापक चेअरमन मिलिंद दहिवले, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे, केंद्रीय संघटक शिवचरण उज्जैनकर सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 संमेलनात महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील 25 साहित्यकांना अंकुर वांग्मय साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले. दोन दिवस चांगल्या उपस्थितीने यशस्ही झालेल्या या संमेलनात विविध चर्चासत्रे झाली. गझल मुशायरा, कविसंमेलन रंगले. शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक शिवचरण उज्जैनकर सर यांच्या अथक परिश्रमाने तसेच नियोजनाने हे संमेलन यशस्वी झाले.

Related posts: