|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खासबागमध्ये झाड पडून नुकसान

खासबागमध्ये झाड पडून नुकसान 

प्रतिनिधी/ बेळगाव

खासबाग येथे नागरी वसाहतीमध्ये एक भलेमोठे झाड कोसळून नुकसान झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामध्ये काही मालमत्तांचे नुकसान झाले. मात्र केवळ सुदैवानेच यामध्ये प्राणहानी झाली नाही.

खासबागमधील बाजार गल्ली येथील मरगम्मा मंदिराच्या समोर दुपारी 2 च्या सुमारास एक मोठे झाड कोसळले. यामुळे येथील तीन विद्युतखांबही कोसळले. तसेच विद्युतभारित तारा तुटून या भागातील विद्युतपुरवठा ठप्प झाला. तारा तुटून अचानक विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या उपकरणांचेही नुकसान झाले. बाजार गल्लीसह बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली परिसरात हा फटका बसला.

विस्तीर्ण अशा या झाडाच्या फांद्या नजीकच्या घरांवर तसेच आस्थापनांवर पडल्या. त्यामुळे कौले फुटून जुन्या इमारतींचेही नुकसान झाले. येथील मरगम्मा मंदिर परिसरात फुलांची विक्री करणाऱया मेहबुब शेख यांचे दुकान आणि आनंद कणबरकर यांचे केळी विक्रीचे दुकानही उद्ध्वस्त झाले. या मार्गावर नेहमी नागरिकांची वर्दळ सुरू असते. दुपारच्या उन्हाच्या वेळी रस्ता निर्मनुष्य होता. त्यावेळी ही घटना घडल्याने कोणतीही जीवीतहानी घडली नाही.