|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लेफ्टनंट जनरल अशोक आंबे यांची मराठा इन्फंट्रीला भेट

लेफ्टनंट जनरल अशोक आंबे यांची मराठा इन्फंट्रीला भेट 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यांनी शौर्यगाथा, मराठा वॉर मेमोरिअल गॅलरी यांना भेटी दिल्या. तसेच प्रशिक्षणावेळी अजून कशा पद्धतीने सुधारणा करता येईल, याविषयी चर्चा केली.

ब्रिगेडिअर गोविंद कलवाड यांनी परम विशि÷ सेवा मेडल, अतिविशि÷ सेवा मेडल, सेना मेडल प्राप्त लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे यांचे स्वागत केले. एनडीएचे विद्यार्थी व मराठा रेजिमेंटलच्या जंगी पलटनच्या पहिल्या बटालियनमध्ये आंबे यांचा सहभाग होता. 7 जून 1980 मध्ये ही बटालियन सुरू करण्यात आली होती. 39 वर्षांच्या लष्करी सेवेत त्यांनी देश व विदेशात सेवा बजावताना अनेक पदे भूषविली आहेत. एनडीएच्या खडकवासला येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांनी डेप्युटी कमांडर व चीफ इन्ट्रक्टर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

रोहिडेश्वर येथील जंगल कॅम्पला भेट देऊन जम्मू-काश्मीर येथे काम करण्यासाठी कशा पद्धतीने जवानांना तयार करणे गरजेचे असते, याविषयीचे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थी जवानांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मराठा लाईट इन्फंट्रीचे नाव उज्ज्वल होईल, यासाठी प्रयत्न करा. तसेच आपले घेतलेले प्रशिक्षण, कौशल्य हे देशाच्या सेवेसाठी वापरा, असे त्यांनी सांगितले.