|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बंद ट्रकला दुचाकीची धडक, चालक जागीच ठार

बंद ट्रकला दुचाकीची धडक, चालक जागीच ठार 

वार्ताहर/ संगमेश्वर

रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दत्ताराम भिकाजी मुदगल (25) हा जागीच ठार झाला.  या अपघाता दुचाकीवर मागे बसलेला त्याचा भाऊ अंकुश महादेव मुदगल (35) गंभीर जखमी झाला आहे. माखजन ते नारडुवे मार्गावरील मौजे कासे गावात सोमवारी रात्री 8 च्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत सहदेव सोनू मुदगल यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. दत्ताराम मुदगल आपला भाऊ अंकुश याच्यासह  दुचाकी (एमएच 04 सी एन 508) वरुन माखजन येथे आला होता. माखजन येथून ते परतत असताना मौजे कासे येथे हा अपघात झाला. रस्त्याच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकच्या (एमएच 08-7055) येथे डावीकडील पाठीमागील टायरवर दुचाकीची जोरदार धडक दिली. यात दत्ताराम मुदगल याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. तर मोटारसायकलच्या पाठीमागील अंकुश हा गंभीर जखमी झाला आहे.

जखमीला 108 रुग्णवहिका चालक काशिनाथ फेफडे यांनी संगमेश्वरहून रत्नागिरीत उपचारार्थ दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच माखजन दुरक्षेत्राचे मुरुडकर, दसुरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल मुरुडकर करीत आहेत.

Related posts: