|Monday, September 23, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » उर्वीच्या उर्मीला विक्रमाचे कोंदण

उर्वीच्या उर्मीला विक्रमाचे कोंदण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी, कडाडणाऱया विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत मुळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणाऱया उर्वी अनिल पाटील या 11 वर्षाच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंज मधील 14 हजार 400 फुटावरील हमता पास सर केला आहे. एवढया लहान वयात हमता पास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली असून मागील वषी उर्वी ने अवघड असा सरपास टेक पूर्ण केला होता.

उर्वी ने आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली व आपल्या विक्रमाविषयी माहिती दिली. ती म्हणाली, आमच्या हमता टेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील रुमसू बेस कँप वरून 3 जून 2019 पासून झाली. पहिले दोन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे टेक केले. पुढे 5 जून पासून प्रत्यक्ष टेक ला सुरुवात झाली. रुमसू हा 6 हजार 100 फुटावरचा बेस कँप असून पुढे चिक्का (8,100फुट), जुआरु (9,800 फुट) आणि बालुका गेरा(12,000 फुट) असे कॅम्प करत 14,400 फुटावरील हमता पास सर केला. दिवसाला 7 ते 8 तासांचा डोंगरदऱया आाणि बर्फातील हा प्रवास सलग पाच दिवसात पूर्ण करताना शारीरिक व मानसीक क्षमतेचा कस लागणार होता, असा अनुभव उर्वीने व्यक्त केला.

असा सर केला हमतापास

हमतापास हा कुलू आणि स्पिती व्हॅलीला जोडणारा जुना मार्ग आहे. मार्गावरून तेबिटीयन लोकांची ये-जा होते. या मार्गाला सिल्क मार्ग म्हणूनही ओळखले जाते. या टेकिंगमध्ये बालुका गेरा ते रतनथळी व्हाया हमता पास हा टेक सर्वाधिक अवघड होता. बालुका गेरा ते प्रत्यक्ष पास पर्यंत 8 तासांचा प्रवास पूर्णतः बर्फामधील असून सुमारे 2,400 फुट प्रत्यक्ष चढाईचे होते. शिवाय 10 हजार फुटांनंतर ऑक्सजिनचे प्रमाणही कमी होते अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला पाऊस आणि पासवर बर्फवृष्टी असल्याने टेक पूर्ण करताना दमछाक होत होती. पण, अशा अवघड पास वर पोहचल्याचा आनंदच काही और होता.

अशीही होती रिक्स

साधारणपणे अशा प्रकारचे टेक 16 वर्षांच्या युवक-युवतींसाठी असतात. मात्र, उर्वीने मागील वषी वयाच्या 10 व्या वषी अत्यंत अवघड सरपास सर केला होता त्यामुळे यावषी कैलास रथ या ऍडव्हेंचर गृपणे तिला आपल्या गृप मध्ये सामावून घेतले.

तयारी उपयोगी आली

हिमालयातील हमतापास हा अवघड टेक असल्याने मला मानसीक व शारीरिक रित्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रीत केले. सकाळी दोन तास समुद्र किनारपट्टी वरील वाळूत चालायचे व अर्धातास योगा व खास जीम करायची. आहारामध्ये प्रामुख्याने सीफुड व सुकामेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्मयाच्या थंडीत असल्याने अनेक लेअरची कपडे, गॉगल, टेकींग बुट, स्टीकही खरेदी केली त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वी ने आत्मविश्वासाने सांगितले. या टेकसाठी आईस गाईड सुभाष राणा आणि मुंबईच्या केतन पटेल यांनी मदत केल्याचे उर्वी म्हणाली.

एवरेस्ट बेस कॅम्प करण्याचे ध्येय

अवघड अशा सरपास सह हमतापास सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुनावला आहे आणि जगातील सर्वात अवघड एवरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने वाटचालीतील हे एक महत्वाचे पाऊल ठरेल व पुढील वषी पीन पार्वती आणि एवरेस्ट बेस कँप करण्याचे ध्येय असल्याचे उर्वी सांगते.