|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » स्पाइसजेट विमानाचा टायर फुटला; इमर्जन्सी लँडिंग

स्पाइसजेट विमानाचा टायर फुटला; इमर्जन्सी लँडिंग 

ऑनलाईन टीम / जयपूर :

राजस्थानमधील जयपूर विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे स्पाइसजेट विमानाचे बुधवारी सकाळी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दुबई-जयपूर एसजी-58 या विमानाचा इमर्जन्सी लँडिंग करताना टायर फुटला. या विमानात 189 प्रवासी प्रवास करत होते. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. जयपूर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर विमानातील प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.