|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » मंगेश देसाई दिसणार पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत

मंगेश देसाई दिसणार पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठी चित्रपट अभिनेत मंगेश देसाई त्याच्या आगामी ‘लाल बत्ती’ चित्रपटात एका पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसणार आहे. गिरीश मोहिते यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, येत्या 26 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाविषयी बोलताना मंगेश देसाई म्हणाला, ‘लाल बत्ती’ चित्रपटाच्या निमित्ताने मला एका कर्तव्यकठोर तरीही अतिशय संवेदनशील अशा पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारायला मिळाली आहे. माझ्यासाठी ही गोष्ट नक्कीच समाधानकारक आहे. या भूमिकेसाठी मी खास ठाणे येथील क्विक रिस्पॉन्स टीम कडून खडतर टेनिंग घेऊन पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेसाठी आवश्यक असणाऱया गोष्टी शिकून त्या आत्मसात केल्या आहेत.