|Monday, September 23, 2019
You are here: Home » Automobiles » ‘एमजी हेक्टर’ लवकरच भारतात

‘एमजी हेक्टर’ लवकरच भारतात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बहुप्रतिक्षीत एमजी मोटर्स या ब्रिटीश कार उत्पादन कंपनीची पहिली एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ लवकरच भारतात लाँच होत आहे. येत्या 15 जूनपासून ग्राहकांना या एसयूव्ही कारची टेस्ट ड्राइव्ह करता येणार आहे. 4 जूनपासूनच कारच्या ऑनलाइन बुकींगला सुरुवात झाली आहे. जून अखेरपर्यंत ही कार भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.

‘एमजी हेक्टर’ ही ‘एसयूव्ही’ श्रेणीतील कार टाटा हॅरिअर, ह्युंदाई पेटा आणि जीप कॅम्पस या गाडय़ांना बाजारात टक्कर देणार आहे. नवीन युगातील भारतीय ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यास एमजी हेक्टरला उच्च दर्जाच्या स्थानिक सामग्रीने विकसित करण्यात आले आहे.

‘एमजी हेक्टर’ ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. 19 विशेष सुविधांनी सज्ज असलेली ही 48 व्ही हायब्रिड कार आहे. या कारची लांबी 4655 मिमी, रुंदी 1835 मिमी आणि उंची 1760 मिमी इतकी आहे. कारच्या पुढील बाजूला क्रोम फिनिशसह काळय़ा रंगाचे मजबूत ग्रिल देण्यात आले आहे. डॅशबोर्डमध्ये आयस्मार्ट नावाने 10.4 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे.