|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » leadingnews » ‘चंद्रयान-2’ 15 जूलैला झेपावणार 

‘चंद्रयान-2’ 15 जूलैला झेपावणार  

ऑनलाईन टीम / हैद्राबाद :

   भारताचे बहुप्रतीक्षित ‘चंद्रयान-2’ हे येत्या 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी आकाशात झेपावणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज या मोहिमेची तारीख जाहीर केली. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची माहिती दिली.

 सिवान म्हणाले, ‘चंद्रयान-1’च्या धर्तीवरच ‘चंद्रयान-2’ ची संपूर्ण मोहीम  असणार आहे. ‘चंद्रयान-2’ च्या निमित्ताने अवघ्या दहा वर्षांत ‘इस्रो’ दुसऱयांदा चंद्रावर स्वारी करणार आहे. ‘चंद्रयान-2’चे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. या यानाचे एकूण वजन 3800 किलो आहे. यापैकी रोव्हरचे वजन 27 किलो व लांबी 1 मीटर आहे. लँडरचे वजन 1400 किलो आणि लांबी 3.5 मीटर आहे. तर, ऑर्बिटरचे वजन 2400 किलो आणि लांबी 2.5 मीटर आहे.   ‘चंद्रयान-2’ च्या चंद्रावर उतरण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. प्रेक्षपणासह या संपूर्ण मोहिमेवर 978 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सियान यांनी सांगितले.