|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रसिद्ध अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

डॉ. कोल्हे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचे नेमके कारण समजू कले नसले तरीही राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे अमोल कोल्हे घराघरात पोहचले आहेत. त्यांच्या भूमिकेचा निवडणुकीत त्यांना नक्कीच फायदा झाला आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव-आढळराव पाटील यांचा पराभव करून त्यांनी शिरूरचा गड घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोल्हेंकडून अपेक्षा आहेत. राष्ट्रवादीत त्यांना महत्त्वाची जबाबदारीही मिळणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत मोदी व भाजपच्या विरोधात राज ठाकरे यांनी जोरदार प्रचार केला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी आणि मनसे दोन्ही पक्ष जवळ आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत ते एकत्र येतील, अशाची चर्चांना उधाण आले आहे. त्यातच कोल्हे यांनी राज यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चाना अधिक बळकटी आली आहे.