|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » साताऱयाचा चंदनचोर अटकेत, नऊ वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

साताऱयाचा चंदनचोर अटकेत, नऊ वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा 

ऑनलाईन टीम  / पुणे :

पोलिसांना नऊ वर्षापासून गुंगारा देणाऱया चंदनचोराला युनिट चारच्या पथकाने बुधवारी अटक केली. अनिल तानाजी जाधव (41, रा. सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात चंदनाची तीन झाडे तोडून नेल्याचा गुन्हा 11 मे 2010 रोजी दाखल आहे. या गुन्हयात यापूर्वी कजन उर्फ जुर्मेश फुटेल, सनद मोहनलाल राठोड, सोनदलाल भावश्या पठार (सर्व रा. खंडवा, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या गुह्यात अनिल जाधव हा नऊ वर्षापासून फरार होता.