|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सेंट्रल किचन पद्धत रद्द करा

सेंट्रल किचन पद्धत रद्द करा 

शालेय पोषण आहाराचा ठेक्यासाठी महिला रस्त्यावर

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 महापालिकेतील शाळांमधील शालेय पोषण आहार आता सेंट्रल किचन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बचत गटातील महिलांचा उदरनिर्वाह बंद होणार आहे. त्यामुळे सेंट्रल किचन पद्धत तात्काळ रद्द करावी. सध्या कार्यारत असणाऱया बचत गटांनाच कामांचा ठेका द्यावा. या मागणीसाठी बचत गटातील महिलांनी महापालिकेसमोर मंगळवार पासून (दि.11) उपोषण सुरु केले आहे.

 जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सेंट्रल किचनमुळे स्थानिक बचत गट, स्थानिक कामगारांचे काम जाणार आहे. शेकडो महिलांवर बेरोजगारी लादली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील 1 लाख 75 हजार महिला बेरोजगार होणार आहे. महापालिकेने सेंट्रल किचन पद्धतीने शालेय पोषण आहार देण्यासाठी निविदा काढली. दिल्ली, मुंबई, कोल्हापूर, कागल, सांगली येथील काही बडय़ा लोकांनी बचत गटानी निविदा भरली आहे. संबधित संस्था अगर कंपनीचा 10 लाख डिपॉझिटच अट घातली आहे. यामुळे लहान बचत गटाना काम मिळणार नाही.

 शालेय पोषण आहाराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेचा आहे. महापौर सरिता मोरे यांच्याकडे यासंदर्भात भेटल्यानंतर अट शिथिल केली. 10 हजार विद्यार्थी संख्यावरुन दोन हजारावर आणली आहे. याचप्रमाणे संपूर्ण सेंट्रल किचन पद्धतच रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्राचार्य ए.बी.पाटील, संघटनेच्या शहराध्यक्षा वर्षा कुलकर्णी, आश्विनी साळोखे, कल्पना सोराटे, साधना पाटील, सपना लाड, स्नेहल पाटील, सरिता पोवार, कल्पना माने, आशा शिंदे आदी उपस्थित होते.

  पाच महिलांचे आमरण उपोषण

 मनपा शिक्षण समिती प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बचत गटांना ठेका मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी त्यांनी भूमीका घेतली. मंगळवारी सकाळी 11 वाजता सुनिता मोहिते, मनिषा बामणे, शशिकला रायकर, छाया जाधव, संगिता घोरपडे या पाच महिलांनी आमरण उपोषणाला सुरवात केली। अशा प्रकारे महिल प्रथमच उपोषणाला बसल्या आहेत. मागणी मान्य झाली नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.त्ततत