|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘मॉल’ला टक्कर देण्याची शेतकरी संघात क्षमता

‘मॉल’ला टक्कर देण्याची शेतकरी संघात क्षमता 

खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचा विश्वास

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शेतकरी संघाची ओळख सातासमुद्रापार झालेली आहे. विश्वास आणि गुणवत्तेच्या पातळीवर सहकारतील आदर्श मंदिर म्हणून संघाची ओळख असल्याने ‘मॉल’ संस्कृतीचे कितीही आक्रमण झाले तरी त्याला टक्कर देण्याची क्षमता शेतकरी संघात आहे. असे गौरोद्गार नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी काढले. खासदारपदी निवड झाल्याबद्दल जिल्हय़ातील दोन्ही नूतन खासदारांचा  शेतकरी संघाच्यावतीने सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांचा चेअरमन अमरसिंह माने. माजी चेअरमन युवराज पाटील, व्हा. चेअरमन बाबासाहेब पाटील-भुयेकर यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. चेअरमन अमरसिंह माने यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. खासदार माने, प्रा. मंडलिक यांनी सहकारी संस्थांना केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, तसेच शेतकरी संघास नाबार्डकडून कमी व्याज दराने अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली. संचालक युवराज पाटील, व्यंकप्पा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व संचालक, व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ, कर्मचारी उपस्थित होते.