|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उचगावमध्ये एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू

उचगावमध्ये एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू 

उचगाव/वार्ताहर

 येथील रमेश अरुण चव्हाण (वय 45 रा. पूर्वभाग शांतीनगर फासेपारधी वसाहतीत, उचगाव, ता.करवीर ) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. ते गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयात शिपाई होते.

 चव्हाण काही दिवसांपूर्वी कुटुंबियांसह बाहेरगावी फिरायला गेले होते. परत आल्यानंतर त्यांना ताप, सर्दीचा त्रास सुरू झाला. न्यूमोनियासदृश आजार बळावला. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात 15 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. चव्हाण यांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे
रुग्णालयाने सांगितल्याची माहिती उचगावचे माजी सरपंच गणेश काळे यांनी दिली. मनमिळावू चव्हाण यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

उचगाव प्राथमिक आरोग्य केद्रांचे दुर्लक्ष

स्वाईन फ्लूने रमेश चव्हाण यांचा मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात असणाऱयांना औषधपोचार करणे गरजेचे होते. मात्र उचगाव प्राथमिक केंद्राने दुर्लक्ष केले. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सीपीआरमध्ये औषधे घेतली, अशी माहिती सरपंच मालुताई काळे व माजी सरपंच गणेश काळे यांनी दिली.