|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सहा महिन्यापासून फरारी असलेल्या दरोडेखोरास अटक

सहा महिन्यापासून फरारी असलेल्या दरोडेखोरास अटक 

प्रतिनिधी/कोल्हापूर

 पाचगाव परिसरात सशस्त्र दरोडय़ाच्या तयारीत असणाऱया टोळीतील सहा सराईत गुडांना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर अन्य तिघे संशयित पसार झाले होते. यातील जुनेद फारूक शेख (वय 31 रा. मलकापूर,ता. कराड) याला मंगळवारी 11 जून रोजी अटक केली. यातील आणखी दोघांचा शोध सुरु असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. यापूर्वी संशयित किरण गुलाब गावीत, संदीप शिवाजी कांबळे, शिवराज सुरेश इंगवले, श्रीकांत उर्फ गोटय़ा चंद्रकांत कदम, चेतन शिवाजी कांबळे, नितीन गणपत शिर्के यांना अटक केली आहे..

   कळंबा आय. टी. आय. ते पाचगाव जाणारे रोडवर हनुमाननगर येथील बसस्टॉपजवळ काही गुंड दोन कारमधून येवून पिस्तुलमधून गोळ्या घालून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱया कराडमधील टोळीला जुना राजवाडा पोलिसांनी जेरबंद केले होते. तर तिघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते. त्यातील जुनेद फारूक शेख याला जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी मलकापूर (ता. कराड) येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.