|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रेल्वे पोलिसांकडून पत्रकाराला मारहाण

रेल्वे पोलिसांकडून पत्रकाराला मारहाण 

उत्तरप्रदेशच्या शामली जिल्हय़ात मंगळवारी रुळावरून घसरलेल्या मालगाडीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. नागरी वेशात असलेल्या रेल्वे पोलिसांनीच मारहाण करत पत्रकाराचा कॅमेरा काढून घेतल्याचा आरोप आहे. पत्रकाराचे कपडे उतरवून त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.