|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » पीएफ होणार बँकेत जमा

पीएफ होणार बँकेत जमा 

यूएएन नंबरवरून रकमेची मिळणार माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भविष्य निर्वाह निधी भारतातील कारगारांच्या कल्याणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. या निधीच्या यूएएन नंबरचा वापर करून जमा रकमेची माहिती करून घेता येते. याचसोबत आता यूएएन नंबरने हा निधी थेट बँकेत जमा करता येणार आहे.

सरकारच्या किरकोळ तरतुदी कायदा, 1952 अंतर्गत, निवृत्त झाल्यानंतर नोकरदाराच्या हातात काही पैसे असावेत यासाठी पगारातून दरमहा काही रक्कम बाजूला काढली जाते. या निधीसाठी जितकी रक्कम निश्चित झाली असेल त्याच्या निम्मी रक्कम पगारातून कापली व निम्मी रक्कम कार्यालयाला भरण्यात येते. या निधीसाठी यूएएन नंबर शाश्वत केला आहे. जेव्हा कामाचे ठिकाण अथवा कार्यालय बदलले जाते तेव्हा या 12 अंकी नंबरमध्ये बदल होत नाही. या नंबरद्वारे यूनिफाइड मेंबर पोर्टलचा वापर करून ही रक्कम बँकेत जमा करता येणार आहेत.

ऑनलाइन सर्विसेजच्या मदतीने निधीचा परतावा…

यूनिफाइड मेंबर पोर्टलच्या अधिकृत वेबसाइद्वारे (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface) यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग ऑनलाइन सर्विसेजच्या मदतीने निधीचा परतावा करणे शक्य होणार आहे. जर ऑफीसचा पीएफ निधी एखाद्या विश्वस्त संस्थेद्वारे सांभाळला जात असेल तर ही प्रक्रिया यात उपलब्ध करण्यात आली नाही.