|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » उद्योग » ‘स्मार्ट कार्ड उद्योगा’त 2500 कोटींची उलाढाल

‘स्मार्ट कार्ड उद्योगा’त 2500 कोटींची उलाढाल 

2025 पर्यंत 10 हजार कोटींचे लक्ष   स्मार्ट कार्ड आयटी सोल्युशन्स अध्यक्षांची माहिती

वृत्तसंस्था/ मुंबई

सद्यस्थितीत भारतामध्ये स्मार्ट कार्ड उद्योगात 2500 कोटी रुपयांची उलाढाल होत असून 2025 पर्यंत यात 10 हजार कोटी रुपयांपर्यंतचे लक्ष आहे, असे स्मार्ट कार्ड आयटी सोल्युशन्स टेक्नॉलॉजी लिमिटेडचे (एससीआयटी) अध्यक्ष देवेन मेहता यांनी सांगितले.

यात सरकारी ओळखपत्रांच्या क्षेत्राची उलाढाल 500 कोटी रुपयांची असून त्यांमध्ये पॅनकार्ड, चालक परवाना, नोंदणी प्रमाणपत्रे आणि गरिबांसाठीचा आरोग्यविमा या गोष्टींचा समावेश आहे. दूरसंचार क्षेत्रातील कार्ड यांच्या निर्मितीक्षेत्राची उलाढाल 800 कोटी रुपयांची असून या कार्डांची संख्या 95 कोटी आहे. दरवषी या बाजारपेठेचा वृद्धीदर 18 टक्के आहे. पेमेंट कार्डांचा उद्योग हा साधारण 800 कोटी रुपयांवर असून ट्रान्सपोर्ट कार्ड विभाग हा मात्र फारच कमी आहे. यात 100 कोटी रुपये एवढी उलाढाल होते, असे मेहता यांनी सांगितले.

‘एससीआयटी’ आघाडीची उत्पादक कंपनी

स्मार्ट कार्डांमध्ये सरकारी ओळखपत्रे, जीएसएम कार्डे, विविध बँकांची डेबिट आणि पेडिट कार्डे, संस्थांची तसेच सरकारी आणि खासगी संस्थांच्या कार्डांचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी म्हणून ‘एससीआयटी’कडे पाहिले जाते.

एकच मोबिलिटी कार्ड चालणार

सरकारच्या अधिसूचनेमुळे भारतात हा उद्योग प्रगतीपथावर असून त्याला अधिक चालना मिळाली आहे. यामुळे टेन, बस, मेट्रो यांसारख्या वाहतूक साधनांसाठी आता सर्व शहरांमध्ये एकच मोबिलिटी कार्ड चालणार आहे. तसेच संपूर्ण देशासाठी एकच चालक परवाना लागू होणार आहे. सरकार आधार कार्ड कागदावर देण्याऐवजी स्मार्टकार्ड स्वरुपात देण्याच्या विचार करत असून ती तब्बल 1.25 अब्ज लोकांना देण्यात येणार आहेत.