|Saturday, January 25, 2020
You are here: Home » उद्योग » ‘विप्रो’च्या सीईओंचे पॅकेज 27 कोटी

‘विप्रो’च्या सीईओंचे पॅकेज 27 कोटी 

मावळते कार्यकारी अध्यक्ष अझीम प्रेमजींच्या वेतनात 95 टक्क्यांची वाढ

वृत्तसंस्था/ मुंबई

आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी विप्रोचे मावळते कार्यकारी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे वेतन आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये तब्बल 95 टक्क्मयांनी वाढले असून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आबिदाली नीमचवाला यांना याच कालावधीत सुमारे 27 कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे.

वार्षिक आर्थिक विवरणपत्रातून विप्रोने ही माहिती सादर केली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये आझीम प्रेमजी यांना 1.81 कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे. यात 43 लाख रुपये वेतन आणि भत्ते, 91 लाख व्हेरिएबल पे, 9 लाख रुपयांची दीर्घकालीन भरपाई आणि इतर 38 लाख असा समावेश आहे.

विप्रोची सूत्रे मुलगा रीशद प्रेमजीकडे

74 वषीय आझीम प्रेमजी यांनी तब्बल 53 वर्षे विप्रोची धुरा यशस्वीरित्या सांभाळून जुलैच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीनंतर कंपनीची सर्व सूत्रे आपला मुलगा रीशद प्रेमजी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत.

कंपनीच्या सीईओंचे पॅकेज 41 कोटींनी वाढले…

कंपनीचे सीईओ नीमचवाला यांचे पॅकेज 41 कोटीं रुपयांनी वाढले आहे. त्यांना मागील आर्थिक वर्षात 27.3 कोटींचे पॅकेज देण्यात आले होते. त्यात 7 कोटी रुपये वेतन आणि भत्ते, 6 कोटी रुपये व्हेरिएबल पे, 13 कोटी इतर आणि उर्वरित रक्कम असा समावेश आहे.

Related posts: