|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजारात खराब परिस्थितीमुळे घसरण

शेअर बाजारात खराब परिस्थितीमुळे घसरण 

बँक-वाहन कंपन्यांचा परिणाम : सेन्सेक्स 193.65 अंकांनी घसरला

प्रतिनिधी/ मुंबई

बँक आणि वाहन कंपन्यांच्या खराब परिस्थितीमुळे बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बेएसईच्या 30 कंपन्यांच्या समभागावर आधारीत संवेदन निर्देशांक सेन्सेक्स 193.65 अंकांनी (0.48 टक्के) घसरणीसह 39756.81 अंकांवर बंद झाला. तर एनएसईच्या 50 कंपन्यांच्या शेअर्सवर आधारीत संवेदन निर्देशांक निफ्टी 59.40 अंकांनी (0.50 टक्के) घसरणीसह 11906.20 स्तरावर बंद झाला.

दिवसभर व्यवसायात सेन्सेक्सने 39982.10 च्या किमान स्तरावर तर 39623.53 च्या घसरणीच्या स्तरावर झेप घेतली. निफ्टीने 11962.45 चा किमान स्तर तर 11866.35 चा कमाल स्तर पकडला.   

बीएसईच्या आठ कंपन्यांचे शेअर्स वाढीच्या स्तरावर तर 22 कंपन्यांचे शेअर्स घसरणीच्या स्तरावर बंद झाले. तसेच एनएसईच्या 14 कंपन्याचे शेअर्समध्ये 35 कंपन्यांचे शेअर्समध्ये खरेदी आणि एका कंपनीतच्या शेअर्समध्ये व्यापार झाला नाही.

‘या’ शेअर्समध्ये होती तेजी

बीएसईच्या टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक 2.60 टक्के, ओएनजीसीचे 0.86 टक्के, वेदान्ताचे 0.50 टक्के, सन फार्माचे 0.47 टक्के आणि टीसीएसचे शेअर्स 0.25 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. एनएसईच्या टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक 2.70 टक्के, गेलचे 1.39 टक्के, ओएनजीसीचे 0.95 टक्के, वेदान्ताचे 0.71 टक्के आणि टीसीएसचे शेअर्स 0.50 टक्क्यांनी वाढीसह नोंद झाले.

‘या’ शेअर्समध्ये झाली घसरण

बीएसईच्या येस बँक शेअर्समध्ये सर्वाधिक 3.34 टक्के, मारुतीचे 1.79 टक्के, टाटा मोटर्सचे 1.71 टक्के, कोटक बँकचे 1.65 टक्के आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स 1.55 टक्क्यांनी घसरणीसह नोंद झाले. तर इंडियाबुल हौसिंग फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक 7.88 टक्के, येस बँकचे 3.19 टक्के, इफ्राटेलचे 3.18 टक्के, टेक महिंद्राचे 1.78 टक्के आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स 1.66 टक्क्यांनी घसरले.

मंगळवारी बाजारात होती दर्जेदार तेजी

चांगल्या वैश्विक संकेतांमुळे मंगळवारी बाजारात दर्देजार तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी सलग तिसऱया दिवशीही तेजीत कायम राहिला होता. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स आणि टीसीएसच्या शेअर्सने बाजाराला सावरले. व्यापारात सेन्सेक्स सुमारे 166 अंकांच्या वाढीने बंद होण्यात यशस्वी झाला. तर निफ्टीत 43 अंकांची वाढ होत 11966 च्या स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले होते.