|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » विंडीज विरूद्धच्या सामन्यासाठी बटलर तंदुरूस्त

विंडीज विरूद्धच्या सामन्यासाठी बटलर तंदुरूस्त 

वृत्तसंस्था/ लंडन

इंगलंडचा यष्टीरक्षक जोस बटलर याला दुखापत झाली होती पण आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी होणाऱया विंडीज विरूद्धच्या सामन्यात तो निश्चित खेळणार असल्याची माहिती संघाचे प्रमुख प्रशिक्षक ट्रेव्हर बेलीस यांनी दिली.

गेल्या शनिवारी कार्डिफ येथे झालेल्या या स्पर्धेतील बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात खेळताना 28 वर्षीय बटलरच्या उजव्या मांडीचा स्नायु दुखावला होता. तयामुळे तो यष्टीरक्षण करू शकला नाही. दरम्यान त्याची ही दुखापत आता पूर्णपणे बरी झाली असून विंडीज बरोबरच्या सामन्यासाठी तो उपलब्ध राहणार असल्याचे इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. बांगलादेश बरोबरच्या सामन्यात बटलरच्या जागी बेअरस्टो याने यष्टीरक्षण केले होते. इंग्लंडचा संघ गुरूवारी सराव करणार असून या सरावावेळी बटलरच्या तंदुरूस्तीची चांचणी घेतली जाईल. इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील शुक्रवारचा सामना साऊदम्पटन येथे खेळविला जाणार आहे.