|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » क्रिडा » कडक उष्णतेमुळे हॉकी सामन्यामध्ये अडथळा

कडक उष्णतेमुळे हॉकी सामन्यामध्ये अडथळा 

वृत्तसंस्था/ मुवनेश्वर

2020 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिकसाठी येथे सुरू असलेल्या एफआयएच सिरीज मालिकेतील सामन्यमध्ये येथील कडक उन्हय़ामुळे हॉकीपटूंची दमछाक होत आहे. बुधवारी सकाळी येथील तापमान वाढल्याने प्ले ऑफ सामन्यामध्ये अधिक विश्रांती ठराविक कालावधीनंतर द्यावी लागल्याने बराच वेळ वाया गेला.

बुधवारी येथे सातव्या आणि आठव्या स्थानासाठी मेक्सिको आणि उझ्बेकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात प्रत्येक आठ मिनिटांच्या कालावधीनंतर खेळाडूंना जलपानसाठी विश्रांती द्यावी लागली. या सामन्यात मेक्सिकोने उझ्बेकिस्तानचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. सामन्यातील 59 व्या मिनिटाला मेक्सिकोचा चौथा आणि निर्णायक गोल कर्णधार गार्सियाने नोंदविला. येथील उष्ण तापमानामध्ये येत्या दोन दिवसांत चांगलीच वाढ होणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आल्याने स्पर्धा आयोजकांनी खबरदारी घेताना या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.