|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » दहा दिवसानंतर धवनबाबत निर्णय घेणार : संजय बांगर

दहा दिवसानंतर धवनबाबत निर्णय घेणार : संजय बांगर 

वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम

शिखर धवनच्या उपलब्धतेविषयी आणखी दहा-बारा दिवसांनी निर्णय घेण्यात येईल. तो संघातील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असल्याने एवढय़ातच त्याला ठरविले जाण्याची घाई करणार नाही, असे भारतीय संघाचे साहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितले.

भारताचे साखळीतील अद्याप चार सामने बाकी असून त्यापैकी तीन सामने धवनला हुकणार आहेत. ‘दुखापत बरी होण्यास काही कालावधी लागणार असून त्याच्या प्रगतीवर आम्ही नजर ठेवून आहोत. दहा ते बारा दिवसानंतर त्याच्या स्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल,’ असे बांगर यांनी स्पष्ट केले. त्याला बदली करण्याचा निर्णय झाल्यास पंतला स्थान दिले जाणार आहे. तो संघात दाखल झाला असून राखीव खेळाडू म्हणूनच तो संघासोबत तोपर्यंत सराव करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.