|Friday, August 23, 2019
You are here: Home » क्रिडा » ऋषभ पंत इंग्लंडला रवाना

ऋषभ पंत इंग्लंडला रवाना 

वृत्तसंस्था / नॉटिंगहॅम

युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला शिखर धवनचा पर्यायी खेळाडू म्हणून बुधवारी इंग्लंडला पाठविण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरात जबरदस्त प्रदर्शन करूनही विश्वचषक संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते. त्यावर बरेच वादविवादही रंगले होते. गुरुवारी भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होत असून त्याआधीच तो येथे दाखल होणार आहे. मात्र त्याचा या सामन्यासाठी विचार करण्यात येणार नाही. स्पर्धेतील उर्वरित सामन्यात तो उपलब्ध होऊ शकेल का, याचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच संघव्यवस्थापन पंतच्या समावेशाचा विचार करणार आहे. ‘संघव्यवस्थापनाने विनंती केल्यानंतर पंतला पर्यायी खेळाडू म्हणून इंग्लंडला बुधवारी पाठविण्यात आले आहे,’ असे सध्या इंग्लंडमध्ये असलेले बीसीसीआयच्या अधिकाऱयाने सांगितले.

धवन जखमी झाल्यानंतर सुनील गावसकर, केविन पीटरसन यासारख्या अनेक माजी खेळाडूंनी त्याच्या जागी पंतला घेण्याची शिफारस केली होती. धवनला सध्या तीन सामन्यासाठी अनफिट ठरविण्यात आले असून तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यास पंतलाच त्याच्या जागी स्थान मिळू शकते.